शालेय Digital रजिस्टर्स


शाळेत दैनंदिन कामकाज करत असताना अनेक प्रकारचे रजिस्टर्स ठेवावे लागतात आणि ते वेळोवेळी अपडेट करावे लागते. या मध्ये कांही रजिस्टर्स खुपच वेळखाणारे आणि खुपच कीचकट त्रासदायक वाटतात. कांही आकडेमोड रोजच करावे लागतात उदा. शालेय पोषण आहार रजिस्टर रोजच्या रोज मिलीग्राम पासून आकडेमोड करावे लागते त्यासाठी रोज कांही मिनिटे यासाठी खर्ची घालावे लागते यासाठी मी शालेय पोषण आहार एक्सेल फॉर्मेट तयार केलेला आहे.

1) शालेय पोषण आहार एक्सेल फॉर्मेट
          या मध्ये खालील रजिस्टर्स तयार होतात
          1. दैनंदिन नोंदी रजिष्टर (खर्च)
          2.तांदूळ प्रपत्र ड
          3. डेली स्टॉक रजिस्टर
          4.दैनंदिन जमा खर्च रजि.

एकाच file मध्ये स्वतंत्र शीटवर सर्व कैलकुलेशन ऑटो होते जवळ जवळ 90% मेहनत वाचते. रोज फक्त data entry शीटवर पट, उपस्थिती, धान्यादि काय शिजविले ? ड्रॉप डाउन मेंउद्वारे निवडले की झाले तांदूळ शीटवर किती तांदूळ खर्ची पडले अथवा शिल्लक राहिले समजते, धान्यादि शीटवर त्या दिवसाचे धान्यादि खर्ची पडल्याचे (की.ग्राम) लक्षात येते. एखाद्या दिवशी मैन्युअली एंट्री करुन पण धान्यादि खर्ची घालता येऊ शकते.

2) शालेय पोषण आहार एक्सेल फॉर्मेट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
DIGITAL SALARY BOOK

Digital सैलरी बुक हे शिक्षकांचे वेतन व टैक्स बाबत एक्सेल फॉर्मेट तयार केलेला आहे. यामध्ये इनकम टॅक्स बाबत 16 नंबर फॉर्म आपोआप तयार होते.
         या फॉर्मेटमध्ये खालील फॉर्मेटचा सामावेश केलेला आहे...
         1.प्रत्येक महिन्याचे पेमेंट स्लिप
         2. वार्षिक संकलित विवरण पत्र
         3.income tax साठी 16 नंबर फॉर्म 

3) डिजिटल सैलरी बुक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
         सदर फॉर्मेट आपल्या शाळेसाठी जरुर वापरा. 


4) DigitalSchool
              digital school यामध्ये पुढील फॉर्मेटचा समावेश केलेला आहे....
              1.शाळासोडल्याचा दाखला (LC)
              2.पाठ्यपुस्तक वाटप रजिस्टर
              3.शाळा निर्गम उतारा
              4.गणवेश वाटप रजिस्टर
              5.विविध शिष्यवृत्ती रजिस्टर
              6.इतर रजिस्टर
          
या फॉर्मेटमध्ये फक्त विद्यार्थ्यांचा 1 नंबर रजिस्टर वरील सर्व नोंदी एंट्री करणे आवश्यक आहे. एकदा एंट्री केल्यावर वरील सर्व रजिस्टर आपोआप तयार होतील.

5) Digital school excel फॉर्मेट download करण्यासाठी येथे क्लिक करा.
Digital classroom

या फॉर्मेटमध्ये विद्यार्थ्यांचे वार्षिक, सत्र संकलित निकाल पत्रक बाबत आकडेमोड ऑटो होते 90% मेहनत वाचते. तसेच या फॉर्मेटमध्ये खालील बाबींचा सामावेश करण्यात आला आहे
            1.सत्र निकालपत्रक
            2.श्रेणी नुसार तक्ता
            3.वार्षिक संकलित निकाल पत्रक
            4.विद्यार्थी प्रगतिपत्रक स्वतंत्र
            5.इतर
6) digital classroom excel format डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
वरील एक्सेल फॉर्मेट आपल्या शाळेसाठी आवश्य वापरा आणि फॉर्मेट कसा वाटला अथवा सदर फॉर्मेटमध्ये आणखी काय पाहिजे यासाठी आवश्य कॉमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरु नका....
 

Disqus Shortname

Comments system