ब्लॉग तयार करा आता ऑफलाईनमध्येेही


आपण कुठे चाललो आहोत, हा एक मोठा यक्षप्रश्‍नच आहे. बरे! या आपल्‍या प्रवासाचे निश्चित कसे काही ध्‍येय आहे काय? की हे निरुद्देश भ्रमण आहे? संगणकाच्‍या अभूतपूर्व क्रांतीमुळे जगाचे चित्र इतक्‍या झपाट्याने बदलत आहे की भविष्‍यकालीन समाजाचे स्‍वरुप काय राहील, ही मानवजातीची यात्रा कुठे संपेल काही सांगता येत नाही. आज केलेला अंदाज आणि आणखी काही वर्षानी बांधलेले आराखडे यांमध्‍येही जबरदस्‍त तफावत असण्‍याचा संभव आहे.जगातील लोगसंख्‍याचा ज्‍याप्रमाणे स्‍फोट होत आहे, तद्वत मनुष्‍याला होणा-या ज्ञानाचाही विस्‍फोट होत चालला आहे. असे असताना आज अनेक अडचणी निर्माण होत आहेत जेव्‍हा एखादी गोष्‍ट करण्‍यासाठी आपण प्रयत्‍नशिल असतो तेंव्‍हा अनेक तांत्रीक अडचणीना समोर जावे लागते. तेवढे कशाला आपल्‍या डोक्‍यात एक झकास कल्‍पना डोकावत असते त्‍याच वेळेला नेट योग्‍यप्रकारे काम करत नाही सर्व्‍हर जाम किंवा लो अशा प्रकारच्‍या अडचणीना तोंड द्यावे लागते. मग त्‍यावेळी वाटते की ब्‍लॉगसुध्‍दा ऑफलाईनमध्‍ये लिहीता आले तर किती बरे होईल हो की नाही?
 
              त्‍यासाठी मित्रानो एक झकास सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्ट या कंपनीने अगदी मोफतमध्‍ये उपलध्‍द करुन दिलेला आहे त्‍या विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.........
Windows Live Writer (WLW)
 
              असे या सॉफ्टवेअरचे नाव आहे विंन्‍डोज लाईव्‍ह रायटरचे नाव जरी लाईव्‍ह म्‍हणून असले तरी त्‍याचे काम आफलाईनमध्‍येही लाईव्‍ह सारखेच वाटते. 90% लोक आज आपले नियमित ब्‍लॉगरमध्‍ये आपले लेख लिहीत असतात.आज  Windows Live Writer च्‍या अनेक महत्‍वपूर्ण फिचर्समूळे लोकांचा लोंडा हळूहळू Windows Live Writer कडे वळताना दिसत आहे.
 
Windows Live Writer मध्‍ये प्रामुख्‍याने पुढील फायदे दिसून येतात...

१. तुम्‍हाला मायक्रोसॉफ्ट आफिसमध्‍ये लिहील्‍यासाखे वाटते.

२. टेबल अॅड करता येते.

३. महत्‍त्‍वाचे म्‍हणजे फोटो अल्‍बम तयार करता येते.

४. फोटोशॉप सॉफ्टवेअर शिवाय फोटो एडिटींग सहज शक्‍य होते.

५. हायपर लिंक्‍स, इमेज इनसर्ट करणे अगदी सुलभ.

६. लेख पाहिजे त्‍या तारखेला व वेळेला प्रशिध्‍द करता येते.

७. ड्राप्‍ट दोन प्रकारे सेव करता येते एक आपल्‍या हार्ड डिस्‍कवर किंवा ब्‍लॉगवर 

८.अतिशय उत्‍तम इनसर्ट पर्याय उपलध्‍द.

९. Advance Cropping ऑप्‍शन उपलध्‍द. 

१०.Picture Rotation
  करता येते.

            वरील अनेक सुविधामूळे आज Windows Live Writer चा वापर करण्‍यासाठी प्रत्‍येक जण प्रयत्‍नशिल असतो. तर चला मग आपण तर मागे का म्‍हणून राहायचे? मी तर कधीच विंन्‍डोज लाईव्‍ह रायटर वापरण्‍यास सुरुवात केलेला आहे तुम्‍ही पण जरुर वापरा. 

Disqus Shortname

Comments system