नवीन टेक्नॉलजी

 मोबाइलची बॅटरी ; समज आणि गैरसमज

लोकांना फोनच्या देखभालीबाबत पुरेसे तांत्रिक ज्ञान नसल्याने फोनच्या देखभालीबाबत अल्पावधीतच अनेक समज-गैरसमज रूढ झाले आहेत. रोज रात्री मोबाइल स्विच ऑफ केल्याने बॅटरीचे आयुष्य वाढते, हा सुद्धा असाच एक गैरसमज आहे. फोन स्विच ऑफ केल्याने बॅटरीच्या कार्यक्षमतेवर कुठलाही परिणाम होत नाही, असे एका संशोधनात आढळून आले आहे.

स्मार्टफोनच्या मेंटेनन्ससाठी तो रोज रात्री बंद करण्याची काहीही आवश्यकता नाही. प्रत्येक बॅटरीला ठराविक आयुष्य असते. त्या बॅटरीचा जितका जास्त उपयोग होईल, तितके तिचे आयुष्य कमी होते. प्रत्येक बॅटरीचे आयुष्य संपूर्ण चार्ज ते संपूर्ण डिस्चार्ज अशा चक्रात (सायकल्स) बांधलेले असते. सामान्यपणे अशा 300 ते 500 सायकल्स पूर्ण झाल्या की, बॅटरीची कार्यक्षमता कमी होऊ लागते. 100 टक्के चार्ज झालेल्या बॅटरीचा अगदी थोडा वापर झाला आणि नंतर ती पुन्हा चार्ज केली तरीही ते एक पूर्ण चक्र म्हणून गणले जाते. 50 टक्के चार्ज झालेली बॅटरी पुन्हा 100 टक्के चार्ज झाली तर ती अर्धी सायकल मोजली जाते. रात्री तसेही आपण मोबाईलचा वापर करत नसल्यामुळे बॅटरी कार्यप्रवण नसते. त्यामुळे रात्री मोबाइल स्विच ऑफ करण्याची आवश्यकता नसते.

तुम्ही फोनचा वापर कसा करता, यावर बॅटरीचे आयुष्य अवलंबून असते. मोबाइलचा उपयोग सतत व्हिडिओ पाहण्यासाठी, गाणी ऐकण्यासाठी किंवा गाडीत जीपीएस पाहण्यासाठी होत असेल, तर बॅटरी फार काळ टिकणार नाही. तसेच बॅटरी सातत्याने गरम वातावरणात ठेवली जात असेल तरीही तिला धोका संभवतो. बॅटरीचे आयुष्य अधिक वाढवायचे असेल तर नियमित कालावधीनंतर ती पूर्णपणे ड्रेन करावी. फोन बंद होऊ द्यावा आणि नंतर पुन्हा 100 टक्के चार्ज करावा. वर्षातून एकदा असे केल्यास बॅटरीचे आयुष्य वाढण्यास नक्की मदत होते.

आता मातृभाषेत बनवा ई-मेल आयडी

इंग्रजी अज्ञानामुळे ई-मेलपासून दूर राहिलेल्या भारतीयांना आता त्यांच्या मातृभाषेत ई-मेल आयडी तयार करता येणार आहे. 'डेटा एक्सजेन' या कंपनीने 12 भारतीय भाषांमध्ये ई-मेल आयडीची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या 'डाटामेल डॉट भारत' या सेवेचे अनावरण केले आहे
.............................................................................................................................................................................................................

टरनेट ब्राउजिंग स्पीड वाढवण्यासाठी

आपण इंटरनेट अ‍ॅडिक्ट झालोय त्यामुळे थोडं कुठं इंटरनेट स्लो झालं की आपला मूड ऑफच होतो. म्हणूनच स्लो इंटरनेट फास्ट करण्यासाठी खालील काही गोष्टी नक्की करून पहा...

* तुम्ही इंटरनेटचा वापर मोबाईलवर करत असाल किंवा लॅपटॉपवर ब्राउजर आणि सिस्टिमचा कॅशे नेहमी रिकामा केला पाहिजे. यामुळे फक्त तुमचा ब्राउजिंग स्पीडचं वाढत नाही तर प्रायव्हसी पण राखली जाते.

* इंटरनेट सर्फिंग करताना आपण अशा वेबसाइट उघडतो ज्याची आपल्याला पुन्हा गरजही पडत नाही. हे सगळ कॅशे मेमरीमध्ये स्टोअर होते. हा स्टोअर झालेला डेटा हार्डडिस्कची बरीच जागा खातो. याचा परिणाम इंटरनेटच्या स्पी़डवर होतो.* तसेच कॅशे मेमरी रिकामी न करण्याची अजून अजून एक समस्या आहे. ती म्हणजे वेबसाइट सकट युजर्सचा पासवर्डही सेव्ह करतो. त्यामुळे नंतर जो व्यक्ती तो संगणक वापरतो तो तुमचा पासवर्ड बघू शकतो. कुकिज कॅशेबरोबर ब्राउजरचे कुकिजसुद्धा प्रायव्हसीसाठी धोकादायक आहे.

* मोबाईलच्या अ‍ॅप्सचा कॅशेसुद्धा रिकामे करणे तितकेच गरजेचे आहे. अँड्राईड स्मार्टफोनपासून विंडोज तसेच आरओएस युजर्सना असे अ‍ॅप्स आहेत की, जे एका ते दोन क्लिकवर तुमचे डिव्हाइस तसेच ब्राउजरची कॅशे मेमरी रिकामी करतात.

* क्लिनमास्टर, सीक्लिनर, अवास्ट क्लिनअप, एवीजी क्लिनर सारखे विनामूल्य अ‍ॅप्स आहेत जे खूप फायदेशीर ठरतात. 

* आरओएस युजर्ससाठी थोडे कमी पर्याय आहेत तरी 360 सिक्यूरिटी ते इंस्टॉल करू शकतात.

* याव्यतिरिक्त जर तुम्हाला कुठलेच अ‍ॅप्स इंस्टॉल करायचे नसतील तरी सेटिंग्समध्ये जाऊन एक-एक करून सगळ्या अ‍ॅप्सची कॅशे डिलीट करू शकता
-----------------------------------------------------------------



Disqus Shortname

Comments system