झाशीची राणी लक्ष्मीबाई (मनू)
इंग्रजांविरुद्ध भडकलेल्या १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामावेळी 'मेरी झाँसी नही दूँगी' अशी गर्जना करणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंचा जन्म कार्तिक वद्य चतुर्दशी,
१९ नोव्हेंबर १८३५ रोजी झाला. तिच्या आईचे नाव होते भागिरथीबाई,
वडील मोरोपंत तांबे हे पेशव्यांच्या दरबारी एक कर्तबगार अधिकारी
म्हणून प्रसिद्ध होते. लक्ष्मीबाईंचे मूळ नाव होते मनकर्णिका. पण घरची मंडळी तिला
मनू म्हणूनच हाक मारत.
मनू चार वर्षांची असतानाच तिची आई निवर्तली. वडिलांच्या तालमीत तिचे शिक्षण झाले. ती मुलगी असूनही अत्यंत धाडसी, निर्भय आणि अत्यंत बुद्धिमान होती. मर्दानी पुरुषी खेळांच्या गोडीमुळे तिने तलवार, भालाफेक, धनुष्यबाण, घोड्यावर बसणे इत्यादींचे शिक्षण समरसतेने घेतले होते.
एके दिवशी नानासाहेब पेशवे हत्तीवरून फिरावयास निघाले होते तेव्हा मनूनेही बसण्याचा हट्ट केला. तेव्हा तिचे वडील तिला म्हणाले, ''बाळ मानू, तुझ्या नशिबात हत्ती कुठला? हत्तीवरून फिरण्याची तुझी योग्यता तरी आहे का?'' हे ऐकताच मनू म्हणाली, ''बाबा, तुमच्या मुलीच्या घरी एकच काय, दहा हत्ती पोसलेले दिसतील तुम्हाला!" मनूचे हे सहज बोलणे खरे ठरले. पुढे झाशी संस्थानचे महाराज गंगाधर यांच्याशी विवाह होऊन ती त्यांची लक्ष्मीबाई झाली.
झाशीला आल्यावर लक्ष्मीबाईने आपल्या मैत्रिणींनाही मल्लयुध्द, घोडदौड, ढाल तलवार इत्यादी युद्धकला शिक्षण दिले. १८५१ मध्ये राणीसाहेबांना एक मुलगा झाला. पण दुर्दैवाने अवघ्या तीन महिन्यांत मरण पावला. त्यामुळे तिने दामोदर नावाचा मुलगा दत्तक घेतला. नंतर गंगाधरपंतही मृत्यू पावले. या प्रचंड दुःखाला सामोरे जात अत्यंत सध्या राहणीने, सावधपणे राज्यकारभार करीत प्रजेच्या हिताच्या सोयी राणीने केल्या.
याचवेळी कुटील नीतीच्या इंग्रजांनी, लॉर्ड डलहौसीने 'दत्तक वारस नामंजूर' करून झाशीचे संस्थान खालसा केले व राणीला पाच हजार रुपयांची पेन्शन जाहीर केली. तेव्हा मात्र राणीने गर्जना केली, 'मेरी झाशी नही दूँगी!' राणीने क्रांतिकारकांच्या मदतीने झाशीचे स्वातंत्र्य टिकविण्याची पराकाष्ठा केली.
शेवटी इंग्रजांचा कुशल सेनापती हा रोज याने आपल्या प्रचंड सैन्यानिशी चाल केली. राणीनेही आपल्या ५१ तोफानिशी बुंदेलखंडी सैनिक, पठाण सैनिक व आपल्या स्त्री सैनिकांसह स्वातंत्र्ययुध्द चालू ठेवले होते. किल्ल्याचे ढासळलेले बुरूज व खिंडारे रातोरात बांधले जात असत. पण ऐनवेळी राणीला मिळणारी तात्या टोपेची मदत इंग्रजांनी रोखून धरली. काही देशद्रोह्यामुळे इंग्रज सैनिक झाशीच्या किल्ल्यात घुसले तेव्हा महिषासुर मादिंनीप्रमाणे राणी शत्रूवर तुटून पडली. झाशीच्या वेढ्यातून धाडसाने बाहेर पडून ती काल्पीला पोहोचली. तेथेही तुंबळ युध्द होऊन ग्वाल्हेरचा किल्ला हस्तगत करण्यात आला. पण हा आनंद फार काळ टिकला नाही.
इकडे हा रोज, ब्रिगेडियर स्मिथ व स्टुअर्ट यांनी तुफान गोळीबार सुरू गोळीबार सुरू ठेवून राणीशी युध्द सुरू ठेवले. आपला शेवट जवळ आला हे कळून राणीने आपला पुत्र दामोदर याला रामचंद्र देशमुखांच्या स्वाधीन केले व आपला धोडा भरधाव सोडला. पण शत्रूच्या गोळीने डाव साधला होता. वीर व साहसी लक्ष्मीबाईचे देशासाठी बलिदान झाले तो दिवस होता १८ जून १८५८.

_______________________________________________________________
लाला लजपतराय
पंजाबचा सिंह' असे लोक ज्यांना अभिमानाने म्हणत त्या सिंहासारख्याच शूर असणाऱ्या लाला
लजपतराय यांचा जन्म २८ जानेवारी, १८६५ रोजी पंजाबातील
लुधियाना येथील जगराव या गावी झाला. त्यांचे वडील राधाकृष्ण हे शिक्षक, लेखक होते. आपल्याप्रमाणे लालादेखील समाजसेवी व्हावा असे त्यांना वाटे.
लालाजी कायद्याचे परीक्षा देऊन निष्णात वकील झाले. त्या काळात शाळांतून दिले जाणारे साचेबंद शिक्षण त्यांना पसंत नव्हते. त्यांनी मित्रांसमवेत लाहोरमध्ये 'दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज' काढले. शाळा उघडल्या. भारतीय संस्कृतीची ओळख व देशप्रेम वाढेल असे शाळा-कॉलेजांमधून उपक्रम राबविले. चारित्र्यवान राजकीय कार्यकर्ते घडविण्याच्या उद्देश्याने 'टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स' ही संस्था त्यांनी स्थापन केली होती. लालाजी जहाल विचारांचे होते. 'वंदे मातरम्' या दैनिकातून व 'पंजाबी' या त्यांच्या वृत्तपत्रातून त्यांनी क्रांतिकारी लेखन करून लोकजागृतीचे कार्य केले.
१९०५ साली सरकारने केलेल्या बंगालच्या फाळणीमुळे पंजाब आणि सर्व देश असंतोषाने पेटून उठला. याला लाला लजपतराय यांचा पाठिंबा होता हे इंग्रज सरकारने ओळखले होते. त्यातच पंजाबात इंग्रजांनी दडपशाही सुरू केली. हे पाहून लालाजींनी १९०७ मध्ये शेतकऱ्यांची संघटना निर्माण करून चळवळ आरंभली. या सरकारविरोधी धोरणामुळे सरकारने त्यांना हद्दपार करून मंडाले येथील तुरुंगात पाठवले.
मंडालेच्या कारावासात १८ महिने काढून परतल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय चळवळीस वाहून घेतले. लो.टिळक, त्रिमूर्ती स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी म्हणून ओळखली जाऊ लागली.
१९१४ सालामध्ये लालाजी इंग्लंड, जपान, अमेरिका येथे गेले. तिथल्या वास्तव्यात अनेक लेख प्रसिध्द करून भारताची बाजू जगापुढे त्यांनी मांडली. 'इंडियन होमरूल लीग' ची स्थापना केली. तेथून लालाजी भारतात परतले तेव्हा क्राँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. 'आयटक' या कामगार अधिवेशनाचेही ते अध्यक्ष होते. लालाजींनी 'महान अशोक', 'श्रीकृष्ण व त्याची शिकवण', 'छत्रपती शिवाजी', 'मॅझिनी', 'गॅरिबॉल्डी', 'यंग इंडिया' इत्यादी पुस्तके लिहिली.
ब्रिटिश सरकारने १९२८ साली हिंदुस्थानच्या राज्यकारभारात सुधारणा घडवून आणण्यासाठी एक कमिशन नेमले होते, त्याचे अध्यक्ष होते 'सायमन'. या मंडळामध्ये एकही हिंदी सभासद न घेतल्यामुळे गांधीजींनी या सायमन मंडळावर बहिष्कार घालण्याचा आदेश दिला. लाहोर येथील मोर्चाचे नेतृत्व करीत होते लाला लजपतराय! 'सायमन परत जा' या घोषणांनी शहर दुमदुमले. याचवेळी गोऱ्या अधिकाऱ्यांनी लालाजींसह सर्वांवर लाठीहल्ला सुरू केला. त्यावेळी लालाजी गरजले, ''माझ्या छातीवरचे हे घाव तुमच्या सत्तेवर पडून सत्ता उलथून टाकणार आहेत!'' याच लाठीमाराने जीवघेणी दुखापत होऊन या पंजाबकेसारीचे १७ नोव्हेंबर १९२८ रोजी निधन झाले.

------------------------------------------------------------------------------------------
बाळ गंगाधर टिळक
आपले सारे आयुष्य देशकार्यासाठी वाहून घेणाऱ्या लोकमान्य टिळकांचा जन्म २३
जुलै, १८५६ रोजी
रत्त्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक,
त्यांच्या राष्ट्रीय व सामाजिक कार्यामुळे जनतेने त्यांना 'लोकमान्य' ही पदवी दिली होती. आईचे नाव पार्वतीबाई
होते तर वडील गंगाधरपंत हे संस्कृत पंडित आणि गणितज्ञ होते. त्यामुळेच टिळकांनीही
संस्कृत, गणित विषयांमध्ये प्रभुत्व मिळविले. टिळक पुण्याला
कॉलेज शिक्षणासाठी आले तेव्हा त्यांच्या किरकोळ शरीरयष्टीकडे मित्र त्यांची चेष्टा
करत. मग मात्र सुदृढ प्रकृती होण्यासाठी टिळकांनी एक वर्ष अभ्यास बाजूला ठेऊन
व्यायाम केला. या दणकट प्रकृतीमुळेच त्यांनी देशसेवा करताना शारीरिक कष्टांना हसत तोंड
दिले.
आपला देश संपन्न व संस्कृती महान असून इंग्रजांच्या गुलामगिरीत का? आपला समाज मागे का? असे टिळकांना प्रश्न पडून लोकजागृती करण्यासाठी आपले आयुष्य खर्च करण्याचा त्यांनी निश्चय केला. आगरकर, चिपळूणकरांच्या मदतीने टिळकांनी पुण्यात 'न्यू इंग्लिश स्कूल' सुरू केले व फर्ग्युसन कॉलेज काढले.
लोकशिक्षणासाठी टिळकांनी 'केसरी' व 'मराठा' वर्तमानपत्रे सुरू करून त्यातून इंग्रज सरकारविरूध्द लेख लिहिले व लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली. त्याचप्रमाणे सार्वजनिक गेणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू करून देशभक्तीपर व्याख्याने व गाण्यातून लोकांना स्वराज्य मिळविण्याची स्फूर्ती दिली. टिळक इंग्रजांविरुद्ध असंतोष निर्माण करीत होते म्हणून इंग्रजांनी त्यांना 'असंतोषाचे जनक' ठरवले.
१९ व्या शतकाच्या अखेरीस प्लेग व दुष्काळात सापडलेल्या जनतेला टिळकांनी गावोगावी जाऊन धीर दिला, मदत केली, त्यावेळी सरकारी अधिकाऱ्यांच्या अत्याचाराचा धिक्कार केला. स्वातंत्र्य लढ्याला सूत्रबद्धता यावी म्हणून स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण असा चौपदरी कार्यक्रम आखला. परदेशी मालाच्या होळ्या पेटल्या. देशभर असंतोषाचा डोंब उसळला. टिळकांवर राजद्रोहाचा आरोप ठेवून १९०८ साली सहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. ब्रह्मदेशातील मंडाले येथील तुरुंगात त्यांना ठेवले गेले. तेथे टिळकांनी 'गीतारहस्य' नावाचा ग्रंथ लिहिला. तेथील सुटकेनंतर त्यांनी अॅनी बेझंट यांच्याबरोबर 'होमरुल चळवळ' सुरू केली. 'स्वराज्य माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!' अशी घोषणा केली. हिंदु-मुस्लिम एकजुटीसाठी त्यांनी 'लखनौ करार' घडवून आणला. कामकरी व बहुजन वर्गास संघटित करणारे ते तेल्या तांबोळ्यांचे पुढारी झाले.
टिळक विवेकनिष्ठ व विचारी तत्त्वज्ञ होते. 'ओरायन' व 'आर्क्टिक होम इन द वेदाज्' हे ग्रंथ त्यांनी लिहिले. एक शास्त्रशुध्द पंचांगही सुरू केले. अशा प्रकारे लोकसेवेचे व स्वातंत्र्यलढ्याचे व्रत आयुष्यभर चालविणाऱ्या पहाडांसारख्या टिळकांचे १ ऑगस्ट, १९२० रोजी मुंबईत देहावसान झाले.

______________________________________________________________
नेताजी सुभाषचंद्र बोस
कोणत्याही राष्ट्रीय कार्यक्रमात आपण सारे भारतीय एकदिलाने 'जय हिंद' ही
घोषणा करत असतो. ही घोषणा आपल्याला दिली आहे आपले नेते सुभासाचंद्र बोस यांनी.
२३ जानेवारी १८९६ मध्ये बंगालमधील कटक या गावात, एका सुखवस्तू घरात सुभाषचंद्रांचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांची बुद्धी तल्लख होती. कॉलेजात गेल्यावर त्यांनी तेथील विद्यार्थ्यांचे नेतृत्व स्वीकारले. अन्याय व अपमान यांविरुद्ध त्यांनी बंड पुकारले. आय्.सी.एस्. परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्यावरही ब्रिटिश साम्राज्याशी विश्वासपात्र राहण्याची शपथ घेण्यास त्यांनी नकार दिला आणि शासकीय सन्मानापासून ते सदैव दूर राहिले.
नंतर राष्ट्रीय आंदोलनात सहभागी झाल्यावर त्यांना अनेकदा कारावास सहन करावा लागला. एकदा ते अखिल भारतीय कॉंग्रेसचे अध्यक्षही झाले; पण मतभेद झाल्यावर कॉंग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी 'फॉरवर्ड-ब्लॉक' नावाची संघटना सुरू केली. सन १९४१ मध्ये स्वतःच्या घरात स्थानबद्ध असतानाच सुभाषबाबू गुप्तपणे भारताच्या बाहेर पडले. अनेक हालअपेष्टा सोसत ते जर्मनीला पोहोचले. तेथून पुढे पाणबुडीने प्रवास करत ते जपानला पोहोचले. ब्रिटिशांच्या सैन्यात असलेले अनेक भारतीय सैनिक जपान्यांच्या कैदेत होते. त्यांच्याशी संपर्क साधून सुभाषबाबूंनी १९४३ च्या ऑगस्टमध्ये 'आझाद हिंद सेना' निर्माण केली. त्यांनी आपल्या सैनिकांना संदेश दिला, 'चलो दिल्ली'. अशा प्रकारे सुभाषचंद्र इंग्रजांच्या ताब्यार असलेल्या भारतावर आक्रमण करून भारताला स्वतंत्र करू इच्छित होते. विजय त्यांच्या टप्प्यात आला होता.
परंतु, अचानक युद्धाचा रंग पालटला. जपानला शत्रुराष्ट्रांकडून पराभव पत्करावा लागला. सुभाषबाबू मलायाला जात असताना त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि ते पुन्हा कोणालाच दिसले नाहीत. त्यांच्या सहकाऱ्यांना ब्रिटिश सरकारने अटक करून त्यांच्यावर खटले भरले.
सुभाषबाबू सांगत, 'कोणतेही बलिदान फुकट जात नाही.' त्याचा अनुभव त्यांच्या हौतात्म्यातून दिसून आला.