योगासने
समस्या
आणि घरगुती उपाय ...
*
उचकी येत असेल तर पुदिण्याची पाने किंवा लिंबाचे रस चोखावे.
*
बोबडेपणा दूर करण्यासाठी रात्री झोपण्याच्या 5 मिनिटांपूर्वी दोन ग्रॅम शेकलेली तुरटी तोंडात ठेवावी.
*
काच किंवा खडा खाण्यात आल्यास गरम दुधाबरोबर तीनदा इसबगोल घ्या.
*
वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यात मध आणि लिंबू मिसळून प्यायला पाहिजे.
*
जखम पिकू नये यासाठी त्यावर सहन होईल तितकी गरम साय बांधावी.
*
मुलांच्या पोटात दुखत असल्यास आले रस आणि 5 ग्रॅम तुळस घोटून तीनदा पाजावे.
*
हिवाळ्यात मुलांना तुळशीची 4
पाने 50
ग्रॅम पाण्यात मिसळून पहाटे पाजावे.
*
पोटदुखीकरिता तुळस आटवून पहाटे-पहाटे घेणे फायदेशीर. छातीत जळजळ होत असल्यास
ग्लासभर गार पाण्यात लिंबू पिळून प्रावे.
*
केळी पचवण्यासाठी 2
लहान वेलच्या पुरेश्रा आहे.
*
जास्त आंबे खाण्यात आले असतील तर ते पचवण्यासाठी थोडे मिठाचे सेवन करायला हवे.
*
तोंडाची दुर्गंध दूर करण्यासाठी डाळिंबाचे जाड सालपट पाण्यात उकळून त्या
पाण्याने गुळण्या कराव्यात.
*
मासे खाताना काटा गळ्यात अडकल्यास केळी खायला पाहिजे.
*
जखमेवरील किड नाहीशी करण्यासाठी त्यावर हिंग पावडर टाकायला हवी.
*
दाढ दुखत असेल तर हिंग लावून कापसाचा गोळा वेदना होत असलेल्या जागेवर ठेवावा.
---------------------------------------------------------------------------------------
जिमला
जाताय तर 'या' गोष्टी टाळा
...
फिट राहण्यासाठी नियमित जिम करणं हे गरजेचं आहे. तुम्ही जर
जिमला जात असाल तर काही अशा गोष्टी आहेत कि,
त्या तुम्ही चुकूनही करू नका. असे केल्यास त्याचे परिणाम आपल्या शरीरावर
होतात. चला तर मग जाणून घेऊयात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण जिमिंगच्या
दरम्यान करू नये...
*
जिमसाठी योग्य तेच कपडे आणि शूज निवडा.
*
जिममध्ये घाम पुसण्यासाठी नेहमी स्वच्छ नॅपकिन वापरा.
*
जिम करण्याआधी आणि जिम झाल्यानंतर लगेच पाणी किंवा ज्यूस पिऊ नका.
*
आपण किती कॅलरीज कमी करतोय किंवा घेतोय याचा हिशोब ठेवा.
*
जर आपल्याला एखादे संक्रमण किंवा रोग असेल तर आधीचं त्याची माहिती जिम
ट्रेनरला द्यावी.
*
वजन कमी करण्यासाठी किंवा फिटनेससाठी लहान-लहान लक्ष्य निर्धारित करा.
*
एखाद्या व्यायामाने आपले अंग दुखत असेल किंवा स्नायू खेचले जात असतील तर लगेच
तो व्यायाम बंद करा.
*
कोणत्याही कंपनीचे प्रोटीन शेक किंवा एनर्जी ड्रिंक सेवन करण्याआधी तज्ज्ञांचा
सल्ला घ्या.
*
ट्रेनरचा सल्ला घेतल्याशिवाय दुसर्यांना पाहून कोणतीही नवीन मशीन ट्राय करू
नका.
* कोणतीही मशीन
वापरण्यासाठी नीट प्रशिक्षण घ्या आणि क्षमतेहून अधिक वर्कआउट टाळा.
------------------------------------------------------------------------------------------------
कसं
ओळखायचं सल्ला चांगला कि वाईट?
हल्ली सल्ला देणाऱ्यांची रांगच लागलेली असते. यातील काही
सल्ले मदतगार असतीलही पण आपण लक्षात घ्यायला हवे की, इंटरनेट,
गाईड किंवा बुक्समधील सल्ला प्रत्येकासाठी लागू होईलच असे नाही. कोणता सल्ला
चांगला आणि कोणता वाईट यात आपली गल्लत होते. यातील योग्य सल्ल्याची निवड कशी
करायची त्यासाठी काही टिप्स...
*
आपल्याला दिलेले ज्यादातर सल्ले विनाकारण किंबहुना आपला गोंधळ उडवण्यासाठी
दिलेले असतात. त्यातील मुठभरच सल्ले फ्रेश किंवा नवे असतात. तसेच जुन्या सल्ल्यात
थोडा फार बदल करून ते प्रस्तुत केले असतात. यापैकी योग्य त्या सल्ल्याची निवडताना
जर तो सल्ला खरोखरच जीवनात लागू होत असतील तरच स्वीकारा नाही तर राहू द्या.
*
बहुदा जुने गाइडेंस आपले करिअर बिघडू शकतात. याचा अर्थ असा नाही की, जुने सल्ले
आजच्या काळासाठी लागू होत नाहीत,
त्यातील काहीतरी तर असतातच पण आपल्याला हे सर्व अगोदर बघून घ्यायला हवे.
आपल्याला असे बनावे लागेल की,
आपण असे वाटायला नकोत की आपल्याला नव्या जमान्यातील बऱ्याच गोष्टी माहिती
नाहीत.
*
आपल्याला फक्त सल्ल्यावर नाही तर त्याच्या गरजेवर लक्ष केंद्रीत करायला हवे.
आपल्याला आपली परिस्थिती समजून त्यांच्या नफ्या, नुकसानीवर ध्यान देऊनच सल्ला घ्यायला हवा. जर या
सल्ल्यांमुळे इतरांचा फायदा होत असेल तर याचा अर्थ असा नाही की, तुमचाही
फायदा होत होईल. या गोष्टी लक्षात ठेऊन चांगल्या आणि वाईट सल्ल्यातील फरक ओळखा.