डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्

डॉ. राधाकृष्णन् तत्त्वज्ञानात निपुण
होते. ते फार विव्दान होते. इंग्रजी भाषेवर त्यांचा प्रभुत्व होतं. तत्त्वज्ञान हा
विषय तसा शुष्क आहे; परंतु ते आपल्या
प्रभावी इंग्रजी भाषणानं करून सांगत. ऐकणाऱ्याला असं वाटे की ह्या व्यक्तीनं
इंग्लंडच्या ऑक्सफर्ड किंवा
केंब्रिज विश्वविद्यायलात शिक्षण घेतलंय. डॉ. राधाकृष्णन काही शिकण्यासाठी कधीही
परदेशात गेले नाही; परंतु त्यांनी राजनीती, शासन, शिक्षण आणि आध्यात्मिक क्षेत्रांव्दारे केवळ
भारतातच नव्हे; तर साऱ्या जगाला प्रभावित केलं. डॉ.
राधाकृष्णन् याचं खरं गाव 'सर्वपल्ली' हे
होतं; परंतु त्यांच्या यापूर्वीच्या दोन पिढ्या तिरुतणी
गावाला गेल्या. नंतर ते मद्रासचे निवासी झाले. त्यांचे वडील पौरोहीत्याबरोबरच
शिक्षकाचंही कार्य करत. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ ला झाला. वयाच्या बाराव्या
वर्षापर्यंत हे आपल्या गावातच राहिले. त्यांच्या वडिलांनीच त्यांना प्राथमिक
शिक्षण दिलं. नंतर एफ. ए. र्यंतच शिक्षण वेल्लोर येथे घेतल. नंतर मद्रासच्या
ख्रिश्चन कॉलेजमध्ये शिकले. डॉ. राधाकृष्णन् याचं कुटुंब फार गरीब किंवा फार
श्रीमंत नव्हतं; परंतु कॉलेजच शिक्षण घेणं कठीण होतं.
त्यांसाठी तरुण राधाकृष्णन् ट्युशन्स घ्याव्या लागत. शिक्षणानंतर ते १९०८ मध्ये
मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर झाले.
डॉ. राधाकृष्णन् यांनी १९१७ पर्यंत
मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये अध्यापनाचं कार्य केलं. ह्याच काळात त्यांनी अनेक
भाषणं दिली. अनेक देशी-विदेशी वृत्तपत्रांमध्ये विव्द्त्तापूर्ण लेख लिहिण्यास
सुरुवात केली. त्यामुळे त्यांची व्याप्ती देश-विदेशात पसरू लागली. त्या
दिवसांमध्ये म्हैसूर संस्थानात एक व्यक्ती दिवण होती. भारत सरकारच्या उच्च
अधिकाऱ्यांशी तिची घनिष्ठ ओळख होती. ह्याशिवाय ती व्यक्ती परदेशातही आपल्या
योग्यतेमुळे प्रसिध्द होती. त्या व्यक्तीचं नाव होतं डॉक्टर विश्वेश्वरैया. जेव्हा
त्यांनी साऱ्या भारतातून विव्दान वक्ती निवडून, पारखून
एकत्र केल्या, त्यात राधाकृष्णनही होते. डॉ. राधाकृष्णन्
यांची म्हैसूरच्या महाराजा कॉलेजमध्ये तत्त्वज्ञानाचा प्रोफेसर म्हणून नियुक्ती
केली. डॉ. राधाकृष्णन् यांनी पीएच.डी. केलेली नव्हती. ह्याचं कारण कदाचित गरिबी
असू शकेल. पण पुढे जगभरातील सगळ्या प्रमुख विद्याकृष्णनना सन्मान आणि प्रेम दिलं.
म्हैसूरमध्ये त्यांना तीन वर्षे राहता आलं. नंतर ते कलकत्त्याला जाण्यास निघाले
तेव्हा म्हैसूरच्या रस्त्यांवर एक अनोखं दृश्य दिसलं, विद्यार्थ्यांनी
आपल्या प्रिय अध्यापकाला गाडीत बसवलं आणि हातानं ती ओढत रेल्वेस्टेशनपर्यंत नेलं.
म्हैसूरच्या डॉ. विश्वेश्वरैयांप्रमाणेच कलकत्त्यात आशुतोष मुखर्जी होते, त्या दिवसात कलकत्ता म्हणजे विद्या, कला आणि
व्यवसायाचं केंद्र होतं, सर मुखर्जी कलकत्ता युनिव्हर्सिटिक
प्राण होते. त्यांनी डॉ. राधाकृष्णन् यांची पोस्ट ग्रॅज्युएट विभागात
तत्त्वज्ञानाचा प्रोफेसर म्हणून नियुक्ती केली. त्या दिवसांमध्ये कलकत्ता विद्यापीठ
फार श्रेष्ठ विद्यापीठ मानलं जाई. आंध्र विद्यापीठाची स्थापन १९२६ मध्ये झाले.
तेथील सिनेट राधाकृष्णन् कुलपती बनवण्याचा विचार करत होती. त्यांना आंध्रमध्ये
आणण्यात तिला यश मिळालं. १९३१ मध्ये राधाकृष्णन् यांनी आपला नवीन कार्यभार
सांभाळला. तिथे त्यांनी प्रयोगशाळा, विद्यार्थी-निवास,
पुस्तकालय, विद्यालयभवन काही काळातच उभारले.
डॉ. राधाकृष्णन् १९१८ मध्ये सेवाग्राम येथे गांधीजींना भेटले. ह्याआधी ते
गांधीजींच्या संपर्कात आले होते. सेवाग्राममध्ये राधाकृष्णन् यांना अभिनंदन ग्रंथ
भेट देण्याची योजना आखली. नंतर ती भेट त्यांना देण्यात आली.
डॉ. राधाकृष्णन् यांना नेहमीच 'शिक्षक' म्हटलं गेलंय;
परंतु त्यांनी शिक्षणक्षेत्रात ४० वर्षे घालवली. त्यांनी शिक्षण,
लेखन, व्यवस्था, राजनीती
आणि शासन ह्या सगळ्याच क्षेत्रात कार्य केलेलं आहे. शिक्षकापासून ते शिक्षण
संस्थाचे व्यवस्थापक, कुलपती म्हणून त्यांनी काम केल.
शिक्षकाच्या रूपात त्याचं योगदान फार मोठ आहे. तसे कलकत्त्याला ते क्वचितच
प्रोफेसर होते. ऑक्सफर्डमध्ये ते प्रोफेसर होते. क्वचितच एखादी व्यक्ती दोन
देशांमध्ये प्रोफेसर राहिली असेल. रशियात राजदूत राहूनही ते लंडनला अध्यापनासाठी
जात होते. त्यांना कोणाच्या शिफारशीची गरज नव्हती. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य
मिळालं. शिक्षणमंत्री होते अबुल कलम आझाद. त्यांनी भारतात शिक्षणाच्या नवीन
व्यवस्थेकरिता एका आयोगाची नियुक्ती केली. राधाकृष्णन् ह्या आयोगाचे अध्यक्ष होते.
शिक्षण शास्त्रज्ञाचा रूपात त्यांनी कित्येक राष्ट्रीय एशियेटिक, तसंच आंतरराष्ट्रीय संमेलनांमध्येअध्यक्षपद भूषविलं, काशीत पाहिलं आशियाई संमेलन भरलं. त्याचेही ते अध्यक्ष होते. १९३७-३८
मध्ये लखनौ येथे दुसरं अधिवेशन झालं, त्याचेही ते अध्यक्ष
राहिले. डॉ. राधाकृष्णन् यांनी आंतरराष्ट्रीय बौध्दिक सहयोग, विश्वशांती आणि विश्वबंधुत्वासाठी फार मोठं कार्य केलं. युनेस्कोच अधिवेशन
त्यांच्याच प्रयत्नांनामुळे दिल्लीत झालं.
मास्को येथून राजदूत म्हणून काम
केल्यावर ते जेव्हा १९५२ मध्ये भारतास येण्यास निघाले तेव्हा रशियाचे अध्यक्ष
स्टॅलिन यांचे डोळे भरून आले. ते म्हणाले, ''आपण
पहिली व्यक्ती आहात, जिनं मला मानव समजून माझ्याशी व्यवहार
केला.'' राज्यसभेत तेव्हा कॉंग्रेसचं बहुमत होतं. डॉ.
राधाकृष्णन् त्यावेळी निर्विरोध भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले.
उपराष्ट्रपती होण्याबरोबरच ते दिल्ली विद्यापीठाचे कुलपती आणि साहित्य अॅकेडेमीचे
उपाध्यक्षही झाले. १९६१ मध्ये डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या निधनानंतर ते भारताचे
राष्ट्रपती झाले, पण त्यांनी राष्ट्रपतीपदाचं वेतन घेतलं
नाही, पोषाख पूर्वीचाच ठेवला. त्यांच्या एकेक अफाट
कार्यामुळेच त्यांना 'भारत-रत्न' हा
सन्मान मिळाला. डॉ. राधाकृष्णन् यांना १७ एप्रिल १९७५ ला देवाज्ञा झाली.