हल्ली व्यक्तिमत्व विकास
हा खूप चर्चेचा आणि अनिवार्य असा विषय झाला आहे. अनेक ठिकाणी त्याचे निरनिराळे अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत पण खरे व्यक्तिमत्व म्हणजे काय आणि त्याचा विकास करायचा म्हणजे
नेमके काय करायचे यामध्ये फार जुजबी ज्ञान दिले जाते माणसाचे बाहय वेश त्याचे त्याचे
बोलणे-वागणे, त्याचे
प्रेझेंटेशन यापुरते हे अभ्यासक्रम मर्यादित असतात. त्यामुळे माणसाच्या
व्यक्तिमत्त्वात खर्या अर्थाने बदल न होता, कुठे कसे वागावे, इथपतच हे अभ्यासक्रम मर्यादित राहतात.या सर्व
गोष्टींचा चार करून आम्ही उद्योजक ऑनलाइन मासिकाच्या वाचकांसाठी खर्या अर्थाने
व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे काय हे मांडणार आहोत. स्वामी विवेकानंदांनी आपल्या
भाषणांमध्ये, साहित्यामध्ये व्यक्तिमत्त्व विकास या विषयाचा उलगडा केला आहे.