संस्कृत शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्या

संस्कृत शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्या
१
सेवेचे नाव किंवा उपक्रम (विषय)
संस्कृत शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधुन संस्कृत विषय शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.
२
त्याची आवश्यकता काय ?
विद्यार्थ्यास उच्च शिक्षण घेण्यास उत्तेजन मिळावे या उद्देशाने हि शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते
३
कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते?
शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग क्रमांक एसकेई १०९८/४२४०/(२२९/९८) माशि-८ दिनांक २० आक्टोंबर ९८ इयत्ता ९ वी व १० वी तील विद्यार्थ्यांसाठी रुपये १०० /- द.म. इयत्ता ११ वी व १२ वीतील विद्यार्थ्यांसाठी रुपये १२५ /- द.म.
४
कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा ?
सबंधित मुख्यध्यापकांमार्फत व शिक्षणाधिकारी (माध्य)जि.प
५
माहितीसाठी अर्ज - किती प्रती ,कोणाकडे,किती कागदपत्रे जोडावेत?
आवश्यक असलेल्या माहितीबाबतची नोंद व सविस्तर तपशील अर्जात करणे आवश्यक आहे.
६
अर्ज कोठे सादर करावा?
सबंधित जिल्ह्याचे मुख्यध्यापकांमार्फत शिक्षणाधिकारी (माध्य)जि.प
७
सेवा मिळण्यास कालावधी ?
अनुदान उपलब्धतेनुसार
८
उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा?
शिक्षण संचालनालय ,माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे

Disqus Shortname

Comments system